Home ठळक बातम्या फ्रेंडशिप डे स्पेशल : येत्या 4 ऑगस्ट रोजी डोंबिवलीत होणार “फ्रेंडशिप रन...

फ्रेंडशिप डे स्पेशल : येत्या 4 ऑगस्ट रोजी डोंबिवलीत होणार “फ्रेंडशिप रन 2024”

तब्बल १०,००० डोंबिवलीकर घेणार आरोग्यदायी मैत्रीची “धाव”

डोंबिवली दि.26 जून :
दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस संपूर्ण जगभरात फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) म्हणून साजरा केला जातो. याच फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने यंदा डोंबिवलीमध्ये 4 ऑगस्ट रोजी प्रथमच “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार तसेच कल्याण डोंबिवली रनर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. (Friendship Day Special: “Friendship Run 2024″ will be held for the first time in Dombivli on 4th August.)

चालणे, धावणे किंवा पळणे हे प्रकार निरोगी आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली समजले जातात. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर्सच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजक रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४” ही स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि १.६ किमीचा फन रन (fun run) या चार विभागात होणार आहे.१.६ किमी चा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे जेथे ६ वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. नामदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप तर्फे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. या मध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी कल्याण डोंबिवली रनर ग्रुप प्रयत्नशील असल्याचे यावेळी डॉ. श्रेयस पळसकर यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप ही ५०० मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली ९ वर्ष डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे.

तर डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे मत नामदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. दिवाळी पहाट आणि गुढी पाडवा स्वागत यात्रा यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे हे शहर आता डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखले जावे यासाठी हा आमचा पहिलाच प्रयत्न असून त्याद्वारे डोंबिवली फिटनेस उपक्रमांचे केंद्रही बनेल याची आम्ही आशा बाळगून असल्याचे चव्हाण म्हणाले. हा कार्यक्रम फक्त स्पर्धा नसून आरोग्य आणि मैत्रीचा उत्सव असणार आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला इ प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार आहे.

Catagory 5Km:
ही धाव अशा उत्साही लोकांसाठी आहे ज्यांनी नुकताच धावण्याचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांना भविष्यात १० हजार मीटर्स आणि 21 हजार मीटर्स सारख्या शर्यतींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रगती करायची आहे. त्या सर्वांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळतील.

Fun Run धाव 1 मैल:
रनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह ही रन मजेदार रन असेल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहभाग ई-सर्टिफिकेट मिळेल.

10किमी आणि 21 किमी :
या दोन श्रेणी कालबध्द शर्यती (timed races) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉनच्या धर्तीवर आयोजित करण्यात आल्या आहेत. आणि भारतातील सर्व प्रमुख धावण्याच्या इव्हेंटसाठी पात्रता म्हणून प्रमाणित केल्या जातील. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना स्पर्धा पूर्णत्वाचे ई-प्रमाणपत्र आणि पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा