Home कोरोना निराधारांच्या मदतीसाठी ‘फ्रेंड्स युनिटी फाउंडेशन’चा पुढाकार

निराधारांच्या मदतीसाठी ‘फ्रेंड्स युनिटी फाउंडेशन’चा पुढाकार

 

कल्याण दि.16 मे :
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून यामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले असून, अनेक निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा या निराधारांच्या मदतीसाठी तरुणाईने पुढाकार घेतला असून फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने ५ मे पासून निरंतर अन्नदान सुरु आहे.

कोरोना काळात अनेकांचे रोजगार ठप्प पडलेत, अनेकांना दोन वेळचं पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा गरजूंना अन्नापासून वंचित न राहू देण्याच्या हेतूने फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने दररोज 2 वेळेचं जेवण देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात आदिवासी पाडा कोनगाव, बकरा मंडी कोनगाव, डम्पिंग ग्राउंड कल्याण, लाल चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड, गुरुदेव हॉटेल स्टेशन रोड, दिपक हॉटेल आदी परिसरातील निराधारांना रोज जेवण दिले जात आहे.

सामाजिक जबाबदारी समजून निःस्वार्थ भावनेने काम करण्यासाठी तरुणाई एकवटली असून सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी या उपक्रमाला स्वेच्छेने कोणाला मदत करायची असल्यास संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि ओमकार कोळी यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा