
कल्याण दि.4 ऑगस्ट :
कल्याणातील अस्तित्व प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे तब्बल 400 नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जतीन प्रजापती यांच्या पुढाकाराने हे लसीकरण शिबीर राबवण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील नवजीवन विद्यालयात केडीएमसीच्या सहकार्याने हे मोफत लसीकरण शिबीर राबवण्यात आले. ज्यामध्ये परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला. तर ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती ही या शिबीराचे वैशिष्ट्य ठरली. समाजातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या लोकांच्या लसीकरणाला केडीएमसीकडून प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शिबीर राबवल्याची माहिती जतिन प्रजापती यांनी दिली.