डोंबिवली दि.2 ऑगस्ट :
मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत आमदार राजू पाटील यांच्यातर्फे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 2 हजार महाराष्ट्र सैनिकांसह मनसे पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यातर्फे कल्याण डोंबिवली तसेच दिव्यातील रिक्षाचालक, नाभिक, पत्रकार, जिमचालक यांचे सर्वात आधी लसीकरण करण्यात आले. यानंतर आता मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत आमदार राजू पाटील यांच्यातर्फे मनसेच्या 2 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोफत लसीकरण संपन्न झाले. या शिबिरात कल्याण पूर्व, डोंबिवली, ग्रामीण, दिवा , शीळ आणि १४ गावातील कार्यकर्त्यांचे लसीकरण करण्यात आले. एकीकडे सत्ताधारी हे लसीकरणाचे शुल्क आकारून लस देत आहेत.
आपला कार्यकर्ता ,महाराष्ट्र सैनिक सुरक्षित झाले पाहिजेत, त्याचसाठी राजू पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे मोफत लसीकरण केल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले.