
ठाणे दि.११ एप्रिल :
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त ठाण्यातील नौपाडा येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. पिनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. योगेश वैद्य यांनी या शिबिरामध्ये रुग्णांना सांधे विकार आणि त्यांचे उपचार या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी २०० हुन अधिक रुग्णांची मोफत तपासणीही करण्यात आली.
यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, संजय वाघुले, डॉ. परवेज शेख, डॉ. संदीप कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.