Home कोरोना खासगी कोव्हीड रुग्णालयातील लिफ्ट कोसळून चौघे जखमी; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

खासगी कोव्हीड रुग्णालयातील लिफ्ट कोसळून चौघे जखमी; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

 

डोंबिवली दि.24 एप्रिल :
कल्याण शीळ रोडवर असणाऱ्या खासगी कोवीड रुग्णालयाची लिफ्ट कोसळून कोवीड रुग्णासह चौघे जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावरूनच ही लिफ्ट कोसळल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

कल्याण शीळ रोडवरी एसए टी वैद्यरत्न या खासगी कोवीड रुग्णालयात काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. काल रात्री दिलीप आणि आशा महाजन दाम्पत्य आपल्या मुलाला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आले. त्यावेळी आशा नारकर या रुग्णालयीन महिला कर्मचाऱ्यासह चौघे जण लिफ्ट मधून पहिल्या माळ्यावर जात होते. पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन तिकडेच लिफ्ट थांबली. त्यावेळी लिफ्टचा दरवाजा उघडत असताना अचानक ही लिफ्ट तळ मजल्यावर येऊन कोसळली. ज्यामध्ये हे चौघेही जण जखमी झाले आहेत. यापैकी महाजन दांम्पत्यासह महिला कर्मचाऱ्यावर डोंबिवलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात रुग्णाल रुग्णालय प्रशासनाकडून लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले. तसेच यात जखमी झालेल्या चौघा जणांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च रुग्णालय प्रशासन करणार असल्याचेही सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा