Home ठळक बातम्या कल्याणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे निधन

कल्याणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे निधन

 

कल्याण दि.9 सप्टेंबर :
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश पेणकर यांचे आज निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे.

कल्याणातील शिवसेनेचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांनी शिवसैनिक म्हणून आपल्या कीर्दीची सुरुवात करून मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती, सभागृह नेते आदी महत्वाच्या पदांवरही काम केले. तर कल्याण डोंबिवलीतील विविध पदांसोबत ते रिक्षा संघटनेचे नेते म्हणूनही ते ओळखले जात. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमाना ते उपस्थित राहत नव्हते.

दरम्यान गेल्या वर्ष दिड वर्षाच्या कालावधीत शिवसेनेच्या विविध ज्येष्ठ नगरसेवक पदाधिकारी यांचे निधन झाले आहे. त्या दुःखातून शिवसैनिक सावरत असतानाच आता प्रकाश पेणकर यांच्या निधनाने त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. कल्याणातील राजकीय पक्षाच्या विविध मान्यवरांनी पेणकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा