Home ठळक बातम्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण पूर्वेतील डॉक्टरांचा फिटनेसचा संदेश

क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण पूर्वेतील डॉक्टरांचा फिटनेसचा संदेश

 

कल्याण दि.२४ डिसेंबर :
कल्याण पूर्व येथील कल्याण ईस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स सोशियल वेल्फेअर असोसिएशन म्हणजेच केम्पस्वा या नोंदणीकृत संस्थेतर्फे नुकतीच केम्पस्वा प्रीमियर लीग २०२२ ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टरांनी जनतेला फिटनेसचा संदेश दिला.

या स्पर्धेत एकूण ८ पुरुष आणि २ महिला संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महिला संघांनी गेल्या महिनाभरापासून या स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता. आपले क्लिनिक सांभाळून तसेच घरातील सर्व कामं उरकून त्या स्पर्धेच्या सरावासाठी परिश्रम घेत होत्या. या स्पर्धेत अमेय मॅवरिक्स या संघाने अंतिम सामन्यात भानुशाली योद्धाज संघाचा पराभव करत केम्पस्वा प्रीमियर लीगच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अमेय मँवरिक्स संघाचे कर्णधार डाँ. विवेक भने यांना सामनावीरचा तर प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार डाँ. सत्यम शर्मा यांना मिळाला. या स्पर्धेत आपली कामगिरी चांगली व्हावी यासाठी सर्व डॉक्टरांचे संघ गेल्या महिन्याभरापासून सराव करत होते. ही स्पर्धा ठाकुर्लीजवळील प्रभाकर एरेना टर्फवर आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचे यूट्यूब च्या माध्यमातून जगभर प्रसारण करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक डॉ. गोकुलसिंग गिरासे यांनी त्याचे समालोचन केले. या स्पर्धेच्या आयोजनात क्रिकेट आयोजन समितीचे डाँ. मुकुंद जाधव, डाँ. महेश गोसावी, डाँ. सुभाष कदम, डॉ. शाम पोटदुखे, डॉ.व्ही.एस.गांगण , डाँ.अमिन शहा, डॉ .विवेक भने, डॉ. अमित दुबे, रिषभ सिंग यांच्यासह केम्पस्वाच्या कार्यकारणी समिती अध्यक्षा डॉ. छाया घारपुरे मॅडम यादेखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत्या. केम्पस्वाच्या ट्रस्टचे अध्यक्ष डाँ. ब्रह्मानंद डांगे, कार्यकारणी समितीचे सचिव डॉ. मुकुंद जाधव तसेच केम्पस्वाच्या कार्यकारिणीचे खजिनदार डाँ. महेश गोसावी यांनी स्पर्धेच्या आयोजनात मोलाची भूमिका निभावली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कल्याण पूर्वेतील सर्व डॉक्टर मंडळींनी परिश्रम घेतले.

केम्पस्वा ही एक संघटना नसून एक मोठे कुटुंब असून या संस्थेतील सर्व डॉक्टर प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असतात. प्रत्येक कार्यक्रमाला चांगलं यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलत असतात.या स्पर्धेतून डॉक्टरांनी सर्व जनतेला आपली फिटनेस म्हणजेच तंदुरुस्ती कशी राखावी याचा संदेश दिला. रोजच्या धकाधकीच्या कामकाजातून या डॉक्टरांनी एक दिवस संपूर्णपणे क्रिकेटसाठी वेळ काढला. आणि आपली फिटनेस चांगली कशी ठेवता येईल हा या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा