Home ठळक बातम्या केडीएमसीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी प्रथमच आनापान कार्यशाळेचे आयोजन

केडीएमसीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी प्रथमच आनापान कार्यशाळेचे आयोजन

कल्याण दि.30 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठी प्रामुख्याने सफाई कामगारांसाठी प्रथमच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व मुंबई‍ परिसर विपश्यना केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने विपश्यना परिचय व आनापान सती ध्यान सराव कार्यशाळेचे आयोजन महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते.(First time Anapan workshop organized for Grade IV employees of KDMC)

सफाई कर्मचा-यांवर पुर्ण परिसराच्या साफ-सफाईची जबाबदारी असते, त्यांना ताण-तणावात काम करावे लागते. त्यामुळे त्यांस मानसिक सबळता देण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

विपश्यना साधना आणि जगभरात होणारे 10 दिवसांचे विपश्यना शिबीर तसेच शरीर व वाणी यांस विकारांपासून दूर ठेवण्यासाठी मनशुध्दी व चित्तशुध्दी करण्यासाठी श्वासावर नियंत्रण आणण्याची प्रचिती स्वतःच्या अनुभूतीतून घ्यावी. याबाबत विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या ओघवत्या व रसाळ भाषेमधील व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मुंबई परिसर विपश्यना केंद्राचे चेअरमन किर्तीभाई देढीया आणि ट्रस्टी संकेत देढीया यांनी या सत्रात उपस्थित सफाई कर्मचारी यांच्याशी सुलभ भाषेत संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक भाषेत उत्तरे दिली. यावेळी प्रथम 10 मिनिटे व नंतन 20 मिनिटे आनापान सती ध्यानाचा, प्रत्यक्ष ध्यान करीत मन शांत करण्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.

महापालिकेतील सफाई कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून, सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेचे नेटके सुत्रसंचालन महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले. या कार्यशाळेसाठी मुंबई परिसर विपश्यना केंद्राचे नितीन सराफ, अशोक इंगळे, जतीन रांभीया यांचेही सहकार्य लाभले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा