Home कोरोना ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल; 1 लाख 3 हजार डोस...

‘कोविशील्ड’ लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल; 1 लाख 3 हजार डोस उपलब्ध

 

ठाणे दि.13 जानेवारी :

कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला साठा आज पहाटे ४.३० वा. जिल्ह्यात दाखल झाला असून १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. एका विशेष वाहनाने ही लस ठाण्यात आणण्यात आली. उपसंचालक कार्यालय ठाणे येथे हा साठा पोहोचविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून ठाणे मंडळासाठी सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे हे लसीकरण मोहिमेचे पुढील नियोजन करीत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा