कल्याण दि. ११ मे :
वापरात नसणाऱ्या भंगाराच्या गाड्यांना आग लागल्याची घटना आज सकाळी कल्याणात घडली. कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी परिसरात ही घटना घडली.
काही महिन्यांपूर्वी केडीएमसीतर्फे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या बेवारस आणि भंगार वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे असणाऱ्या या गड्यांपैकी काही गाड्या केडीएमसीतर्फे कल्याण पश्चिम आधारवाडी परिसरात (नविन सिमेंट रस्ता) आणून ठेवल्या होत्या. या गाड्यांना आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आगीमध्ये याठिकाणी असणाऱ्या ६ गाड्या भस्मसात झाल्याचे दिसून आले.
दरम्यान या आगीची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली.
ह्या घटनेनंतर अर्धा तासात लगेचच एक गोण भरून काहीतरी एका व्यक्तीने न जळालेल्या गाडीच्या बाजूला आणून ठेवले आहे. प्रत्यक्ष त्याला बघून रहिवाश्यांनी आरडाओरडा केला तर ती व्यक्ती पळून गेली.
ह्याचाच अर्थ मुद्दाम ह्या बेवारस गाड्या विल्हेवाट लावण्यासाठी जाळून टाकत असतील तर आजूबाजूला रहिवाशी इमारती आहेत हे ध्यानात असावे.
गाड्यांची विल्हेवाट लावायची ही पद्धत धोकादायक ठरू शकते.