
कल्याण दि.18 एप्रिल :
कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत असताना आता उंबर्डे येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पातही आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती नसून आगीमध्ये कचरा विलगीकरण करणारे मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.