Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत महाबळेश्वरचा फिल : मोसमातील सर्वात कमी 13 अंश सेल्सिअसची नोंद

कल्याण डोंबिवलीत महाबळेश्वरचा फिल : मोसमातील सर्वात कमी 13 अंश सेल्सिअसची नोंद

महिन्याभरात सलग तिसऱ्यांदा तापमान घसरले

कल्याण डोंबिवली दि.30 नोव्हेबर :
ऐरव्ही घामाच्या धारा आणि कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी यंदाचा नोव्हेंबर महिना चांगलाच लकी ठरल्याचे दिसत आहे. या महिन्यात सलग तीन वेळा हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी तर कल्याण डोंबिवलीचा पारा चक्क 13 अंशांपर्यंत घसरला आहे. हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी कल्याण डोंबिवलीसह एम एम आर रिजनमधील प्रमुख शहरांची आकडेवारी “एलएनएन” ला उपलब्ध करून दिली आहे. (Feel of Mahabaleshwar in Kalyan Dombivli: Season’s lowest recorded at 13 degrees Celsius

गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवली परिसरात गुलाबी थंडीने आपला मुक्काम ठोकला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेला हा हवामानाचा बदल नागरिकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. कारण ऐरव्ही दमट आणि आर्द्र हवामानामुळे सकाळ असो की सायंकाळ घामाच्या धारा काही नागरिकांची पाठ सोडत नसतात. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून इथल्या तापमानात लक्षणीय घट होत असून घामाच्या धारांपासून सुटका झाल्याने नागरिक चांगलेच खुशीत आहेत.

त्यातच स्वेटर, कानटोपी, हातमोजे अशा उबदार गोष्टी आपल्याकडे वापराव्या लागण्याचा अनुभव तसा विरळाच. मात्र यंदाच्या गुलाबी थंडीने इथल्या नागरिकांची ही ख्वाहीशही पूर्ण केल्याचा आनंद अधिकच दिसून येतोय. तर रात्री झोपताना आणि सकाळी उठताना आपण नक्की कल्याण डोंबिवलीतच आहोत ना की सातारा महाबळेश्र्वरला असा प्रश्नही काही नागरिकांना पडत आहे.

या महिन्यात 26 नोव्हेबरला 15 अंश सेल्सिअस, 29 नोव्हेंबरला 14 अंश सेल्सिअस आणि आज नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी तर हा पारा आणखी एका अंशांनी घसरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. कल्याणमध्ये आज 13.1 आणि डोंबिवलीत 13.7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

एमएमआर रिजनमधील इतर शहरांचे तापमान…

कल्याण 13.1
डोंबिवली 13.7
कर्जत 11.7
बदलापूर 11.3
अंबरनाथ 12.3
उल्हासनगर 12.8
पलावा 12.8
पनवेल 13.7
पालघर 12.6
ठाणे 16
नवी मुंबई 15.3

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा