Home Uncategorised कल्याणच्या वारकरी संप्रदायाचे नेतृत्व धोंडिभाऊ (बाबाजी) पोखरकर यांचे निधन

कल्याणच्या वारकरी संप्रदायाचे नेतृत्व धोंडिभाऊ (बाबाजी) पोखरकर यांचे निधन

कल्याण दि.12 मे :

कल्याणच्या वारकरी संप्रदायाचे नेतृत्व धोंडिभाऊ (बाबाजी) अनसू पोखरकर (४२) यांचे फुफ्फुसे निकामी झाल्याने उपचारा दरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन मंगळवारी ११ मे २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.

एक महिन्यापूर्वी कोरोनामुळे आधी कल्याण येथे त्यानंतर मुलुंड येथे फोर्टीस येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.

कल्याण शहरात २० वर्षांपासून भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी म्हणून नावलौकीक मिळवत 2 वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाकडून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. ते कल्याणच्या वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करीत होते. कल्याण पश्चिमेतील श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा