Home ठळक बातम्या शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित 29 व्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त...

शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित 29 व्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 128 बाटल्या रक्त जमा

कल्याण दि.8 जानेवारी :
शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे यंदाही प्रभाग क्र. 1 आणि 2 मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान सोहळ्याचे यंदाचे हे 29 वे वर्ष असून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिराला गर्दी केली होती. (Enthusiastic response to 29th Blood Donation Camp organized by Shiv Sena’s Umbarde – Kolivali Divisional Branch; 128 bottles of blood collected)

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारणाच्या तत्वावर शिवसेना विभागीय शाखेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या सव्वा दोन दशकांहून अधिक काळापासून हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. गेल्या 29 वर्षांपासून रक्तदानाचा हा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवणारी ही शिवसेनेची ही कल्याणातील एकमेव शाखा आहे.

तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने या रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाला असून जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हे असेच सुरू राहील असा ठाम विश्वास आयोजक आणि कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.


या रक्तदान शिबिरात सुमारे 128 बाटल्या रक्त जमा झाले. यातील काही हे रक्तपेढीच्या माध्यमातून योग्य त्या पडताळणीनंतर समाजातील गरीब आणि गरजू व्यक्तींना दिले जाते. तसेच एखादा मोठा अपघात झाल्यानंतर जाणवणारी रक्ताची कमी भरून काढण्यासाठीदेखील या जमा झालेल्या रक्ताचा पुरवठा केला जात असल्याचेही आमदार भोईर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, वैशाली भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील , युवानेते वैभव भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा