
डोंबिवलीत संपन्न झाला महायुतीचा मेळावा
डोंबिवली दि.12 नोव्हेंबर :
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र चव्हाण आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे या दोघांनाही बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. डोंबिवली येथे झालेल्या महायुतीचा महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा.डॉ. शिंदे यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
महायुती आहे तर महाराष्ट्राची प्रगती आहे, हे आपले ब्रीदवाक्य असून यानुसार आपल्याला काम करायचे आहे. आपले दोन्ही उमेदवार आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहेत. महायुती सरकारच्या कालावधीत आपण पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासह अनेक कल्याणकारी योजना देखील राबविल्या. यामुळे आज महिलांमध्ये, युवा वर्गामध्ये सर्व नागरिकांमध्ये एक समाधानाचे वातावरण आहे, असे मतही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या पार्श्वभुमीवर आपण सर्वांनी आता एकजुटीने काम करून आपल्या दोन्ही उमेदवारांचा पुढील काही दिवस जोमाने प्रचार करायचा आहे, आणि त्यांना बहुमतांनी निवडून आणायचे आहे, असे आवाहन यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
यावेळी शिवसेना, भाजपा आणि महायुतीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होते.