Home ठळक बातम्या शिक्षण,आरोग्याला प्राथमिकता तर नागरिक केंद्रीत कारभाराला प्राधान्य – केडीएमसीचे नविन आयुक्त अभिनव...

शिक्षण,आरोग्याला प्राथमिकता तर नागरिक केंद्रीत कारभाराला प्राधान्य – केडीएमसीचे नविन आयुक्त अभिनव गोयल

गोयल यांनी आयुक्तपदाचा स्विकारला पदभार

कल्याण डोंबिवली दि.9 एप्रिल :
जिल्हाधिकारीपदी काम करताना आपण शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही घटकांना प्राथमिकता दिली होती. कल्याण डोंबिवलीतही या दोन्ही गोष्टींसह नागरिक केंद्रीत कारभाराला प्रथम प्राधान्य राहील असा विश्वास कल्याण डोंबिवलीचे नविन आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. (Education, health are priorities, while citizen-centric governance is a priority – New KDMC Commissioner Abhinav Goyal)

याअगोदर धुळे आणि हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये सीईओ म्हणून केलेल्या कामाचा आपल्याला अनुभव आहे. ही तिन्ही ठिकाणपेक्षा कल्याण डोंबिवली ही शहरे सर्वाधिक नागरीकरण झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर अगोदर आपल्याकडे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय काय इशू आहेत, त्याचबरोबर काय काय प्रोजेक्ट सुरू आहेत त्यांना गती देण्याचा आपला प्रयत्न असेल. तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासन लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये नागरिककेंद्रीत प्रशासकीय कामकाजासाठी (सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन) आपला प्रयत्न राहणार असल्याचे सूतोवाच आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. नागरिकांच्या तक्रारी असो की त्यांना मिळणाऱ्या सेवा. त्या अधिकाधिक गतीने, पारदर्शकपणे त्यांना कशा देता येतील यासाठी काही सिस्टम्स डेव्हलप करायचे आहेत. आज टेक्नॉलॉजीचे प्रमाणही वाढलेले असल्याने एआयचाही वापर करण्याचा आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असल्याने कल्याण डोंबिवलीतील पायाभूत सुविधा आणि इतर कामांवरही आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगत नविन आयुक्त गोयल यांनी आपल्या कारभाराची दिशा यावेळी स्पष्ट केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा