
माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या प्रभागातील विकास कामांचे म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
कल्याण दि.25 एप्रिल :
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपण खासदार म्हणून निवडून आलो अशी प्रांजळ कबुली भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिली.
कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक संजय पाटील नगरसेविका नीलिमा पाटील यांच्या माध्यमातून म्हसोबा मैदान प्रभागात केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांचे मंगळवारी खासदार म्हात्रे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर सावली ज्येष्ठ नागरिक संघाला भेट देत तेथील सदस्यांशी त्यांनी संवाद साधत लोकसभा निवडणूक प्रचारातील आठवणींना बाळ्या मामांनी यावेळी उजाळा दिला. (Due to the blessings of senior citizens, I am MP today – MP Balya Mama Mhatre)
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी संजय पाटील नीलिमा पाटील यांच्या प्रयत्नातून केल्या जाणाऱ्या शिव कॉलनी परिसरातील गटार आणि छोटे रस्ते नानासाहेब धर्माधिकारी क्रीडा संकुलातील संरक्षण भिंतीचे बांधकाम कोकण वसाहत परिसरातील गटार आणि छोटे रस्ते तसेच नव अशापुरा सोसायटी ते कृष्णाई बंगला जय विशाल सोसायटीपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
तर सावली ज्येष्ठ नागरिक संघाला भेट देत तिथल्या सदस्यांची संवाद साधताना खासदार बाळ्या मामा म्हात्रे म्हणाले की गेल्या वर्षी याच काळात कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रचारानिमित्त आपण ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली होती. आणि तुम्ही सर्वांनी त्यावेळी दिलेल्या भरभरून मतदान रुपीस आशीर्वादाने आज आपण खासदार म्हणून आपल्याशी संवाद साधत आहोत. आपण सर्वांनी दिलेले सहकार्य मी कधीही विसरणार नाही, आपण सर्वजण समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहात. या पार्श्वभूमीवर आपल्या असणाऱ्या विविध अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आपण बांधील असल्याचेही खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले.
सावली जेष्ठ संघाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या सुसज्ज कार्यालयाचे आणि तिथे सुरू असणाऱ्या अभ्यासिकेची पाहणीही खासदार म्हात्रे यांनी केली. तसेच या अभ्यासिकेसाठी आवश्यक असलेले एअर कंडिशनर आणि वॉटर कूलर तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या माऊली जेष्ठ मंडळाला पहिल्यांदा भेट दिल्याबद्दल या अभ्यासिकेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांचा छोटेखानी सत्कार केला.