
कल्याण डोंबिवली दि.11 ऑक्टोबर :
येत्या मंगळवारी (15 ऑक्टोबर 2024) कल्याण डोंबिवलीच्या या भागांतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत-यांत्रिकी उपकरणांच्या दुरूस्तीसाठी येत्या मंगळवारी 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं.6.00 वाजेपर्यंत असा 8 तास बंद राहणार आहे.
या भागांत पाणी नसणार…
परिणामी महापालिकेच्या मोहिली आणि नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रामधून महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामिण विभागात येणाऱ्या मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) तसेच “ब” प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगीधाम, चिकणघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसर आणि डोंबिवलीच्या पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा आवश्यक तो साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.