
कल्याण दि.8 मे :
केंद्र सरकारच्या कोवीन पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमूळे कल्याणच्या आर्ट गॅलरी येथे होणारे 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
या तांत्रिक समस्येमुळे स्लॉट बुक होत नसून जोपर्यंत ही अडचण दूर होत नाही तोपर्यंत आर्ट गॅलरी येथील लसीकरण तात्पुरते स्थगित राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. तसेच ही तांत्रिक समस्या दूर झाल्यावर लगेचच त्याबाबत नागरिकांना कळवले जाईल असेही केडीएमसीने स्पष्ट केले आहे. याठिकाणी ऑफलाईन पद्धतीनेही लसीकरण होणार नसल्याने स्लॉट बुक न झालेल्या नागरिकांनी याठिकाणी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
Online नाव नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या डोस साठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे. ज्यांना online नाव नोंदणी जमत नाही त्यांच्यासाठी मोबाईल प्रलाणाली जाणकाराची सोय करावी मग तो युवा असो वा ज्येष्ठ नागरिक.टोकण सिस्टीम मुळे सगळ्यांना त्रास दायक होतो. सकाळी चार वाजे पासून रांग लावावयाची गरज नाही .नाही तरी लस कोटा मर्यादित असताना उगाच गर्दी करुन संसर्गजन्य परिस्थिती निर्माण करायची आम्ही समजदार आहोत आमचं आरोग्य आपल्या हाती सरकारी यंत्रणेने सखोल विचार करावा…… श्री अरविंद शिंपी पोस्टल पेंशनर कल्याण पुर्व सह सचिव ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कल्याण पुर्व