कल्याण / डोंबिवली दि.7 मार्च :
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील (kalyan- dombivali) कोरोना रुग्णांचे आकडे (increasing corona patients)पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे पुन्हा एकदा औषध फवारणी (drug spraying, fogging) केली जात आहे.
कल्याण डोंबिवलीतील कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये सोडियम हायपो क्लोराइड आणि जंतुनाशक फवारणी तसेच धुरावणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी सकाळी ही मोहीम राबविण्यात येत असून 11 मल्टीजेट वाहने, 4 जीप माऊंटेड फॉग मशीन तसेच 31 हॅन्ड फॉग मशीनचा त्यासाठी वापर केला जात आहे. तर दिवसा रहदारीची अडचण लक्षात घेता रात्री 10 नंतर अग्निशमन विभागाच्या वाहनांद्वारे कल्याण डोंबिवलीत सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान दर आठवड्यागणिक कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून आज तब्बल 271 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.