Home ठळक बातम्या क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार पवन भोईर यांना तर युवा क्रीडापटू राही पाखले,...

क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार पवन भोईर यांना तर युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना ‘शिवछत्रपती पुरस्कार’!

‘हा’ माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान : रविंद्र चव्हाण

डोंबिवली दि.17 एप्रिल :

क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही नितीन पाखले, आदर्श अनिल भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले, त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे. शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. (Dronacharya Award in the field of sports Pawan Bhoir and young athletes Rahi Pakhale, Adarsh ​​Bhoir to receive ‘Shiv Chhatrapati Award’!)

चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील *ट्रॅम्पोलीन* या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ जाहीर झाला याबद्दल या दोन्ही युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला. त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, “हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे.”

डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील *ट्रॅम्पोलीन* या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तसेच त्यांचे गुरू पवन भोईर यांना ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले.

‘माझे डोंबिवलीकर माझा अभिमान’ असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा