Home Uncategorised डोंबिवली विधानसभा : भाजप पदाधिकाऱ्यावरील हल्ल्याचा महायुतीकडून निषेध

डोंबिवली विधानसभा : भाजप पदाधिकाऱ्यावरील हल्ल्याचा महायुतीकडून निषेध

विनाकारण शहरातील वातावरण न बिघडवण्याचेही केले आवाहन

डोंबिवली दि.14 नोव्हेंबर :
डोंबिवली पश्चिमेतील भाजप पदाधिकाऱ्यावर आज सकाळी झालेल्या हल्ल्याचा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच निवडणुकीसाठी विनाकारण शहरातील वातावरण न बिघडवण्याचे आवाहनही यावेळी महायुतीच्या सर्व नेत्यांकडून करण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिमेतील भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या खासगी कार्यालयात आज सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी घुसून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. जुगल हे भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी आणि सोशल मीडियाचे संयोजक आहेत. आज सकाळी आपण आपल्या कार्यालयात बसलेलो असताना काही अज्ञात व्यक्ती कार्यालयात घुसल्या आणि शिवीगाळ करत तसेच अंगावर खुर्च्या फेकत कार्यालयाची नासधूस करायचा प्रयत्न केल्याची माहिती जुगल उपाध्याय यांनी महायुतीच्या पत्रकार परिषेत दिली. तसेच
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचेही उपाध्याय यांनी सांगितले.

दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर महायुतीतील भाजप, शिवसेना, आरपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच पोलिसांनी या हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेण्याची आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली. तर या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या रविंद्र चव्हाण हे इकडे नसले तरी मतदारसंघातील घडामोडींकडे त्यांचे लक्ष आहे. त्यासोबतच या मतदारसंघात केंद्रीय नेतृत्वाचेही लक्ष असून असे प्रकार कोणीही करू नये. आणि शहरातील वातावरण बिघडवू नये. या शहरातील नागरिक आणि महायुतीचे कार्यकर्ते हे शांततेने काम करणारी माणसं आहेत. तसेच या शहराची राजकीय परिपक्वता आहे याच्यापासून आपण दूर न होता, काही दिवसांसाठी असणाऱ्या निवडणुकीसाठी शहराचे वातावरण न बिघडवण्याची काळजी घेण्याचे आवाहन माजी उपमहापौर राहुल दामले यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेला भाजपचे शशिकांत कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, नंदू परब, शिवाजी आव्हाड यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा