Home ठळक बातम्या डोंबिवली स्टेशनच्या फलाट पाचवरील छताच्या कामाला लवकरच सुरूवात – मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील...

डोंबिवली स्टेशनच्या फलाट पाचवरील छताच्या कामाला लवकरच सुरूवात – मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


डोंबिवली दि.24 ऑगस्ट :

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही. त्यामुळे उन्हाचा त्रास सहन केलेल्या डोंबिवलीकरांना पावसाळ्यात लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा आहे. यासंदर्भात मनसेचे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे शेडच्या काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून तातडीने शेडचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. ( Dombivli station roof work to start soon – MNS MLA Pramod (Raju) Patil’s pursuit successful)

मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानक हे रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यासह सर्वाधिक गर्दीचे स्थानक समजले जाते. या स्टेशनवरून दररोज लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र इतकं असूनही या रेल्वे स्थानकावरील समस्यांकडे रेल्वे प्रशासनाच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या स्टेशनवरील फलाट क्रमांक 5 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाजूकडील विस्तारित फलाटावर सुमारे दीड वर्षापासून छत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा माराही सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षापासून प्रवाशांंकडून, रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत बांधण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांंकडे केली जात होती. या कामासाठी निधीही मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्र व्यवहार करत लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली होती.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील 5व्या फलाटावर शेड नसल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाच्या कालखंडात मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.यानंतर आता आमदार पाटील यांना रेल्वेने लेखी आश्वासन देऊन लवकरच शेडचं काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा