Home ठळक बातम्या डोंबिवली शहर आणि महायुतीचा वैचारिक डीएनए एकच, यावेळीही महायुतीलाच आशिर्वाद – मंत्री...

डोंबिवली शहर आणि महायुतीचा वैचारिक डीएनए एकच, यावेळीही महायुतीलाच आशिर्वाद – मंत्री रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

रविंद्र चव्हाण यांच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

डोंबिवली दि.3 नोव्हेंबर :
डोंबिवली शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून यावेळीही डोंबिवली शहर महायुतीलाच आशीर्वाद देईल, असा विश्वास मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या रामनगरमधील सुप्रसिद्ध बोडस हॉल येथे उभारण्यात आलेल्या भाजपा निवडणूक कार्यालयाचे महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. (Dombivli city and Mahayuti have same ideological DNA, blessings to Mahayuti this time too – Minister Ravindra Chavan believes)

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक नगरी म्हणून डोंबिवली शहराला जगभरात ओळखले जाते. या शहराचा सांस्कृतिक वारसा जपत शहरात आधुनिक सोई सुविधा उभारण्यासाठी गेल्या २०-२५ वर्षांपासून अविरत प्रयत्न आपण अविरत प्रयत्न करीत आहोत. त्यातूनच डोंबिवलीकरांशी ऋणानुबंध तयार झाले असून समस्त डोंबिवलीकर बंधु-भगिनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे, माजी महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे, शशिकांत कांबळे, पद्माकर कुलकर्णी, राहुल दामले, नाना सूर्यवंशी, मंदार हळबे, मोरेश्वर भोईर, रा.स्व.संघ समन्वयक आशिर्वाद बोंद्रे, विंदा नवरे, डॉ. मिलिंद शिरोडकर, प्रज्ञेश प्रभुघाटे, संदीप पुराणिक, सुरेश पुराणिक, विनोद काळण, खुशबू चौधरी यांच्यासह डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व मित्रपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने डोंबिवलीकर नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा