डोंबिवली दि.15 जानेवारी :
येत्या सोमवारी 17 जानेवारी रोजी डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार आहे. मोहिली उदंचन केंद्रातून नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे सोमवारी सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास डोंबिवली पूर्व पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.