कल्याण डोंबिवलीसाठी नेमका कोणता मोठा निर्णय जाहीर करणार याची उत्सुकता
कल्याण डोंबिवली दि.१८ ऑक्टोबर :
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचे कल्याण डोंबिवलीकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठे गिफ्ट मिळणार असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. केडीएमसी प्रशासनाकडून डोंबिवलीत सुरू असणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दिवाळी गिफ्टबाबत सांगितले. परंतू हे गिफ्ट नेमकं काय असेल त्याविषयी मात्र त्यांनी अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत कल्याण डोंबिवलीसाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून कल्याण डोंबिवलीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि स्वच्छ करण्याची ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत दिवाळीच्या पूर्व संध्येपर्यंत दिवस रात्र खड्डे भरण्याचे काम सुरू राहणार असून दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना दिलास देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली.
कल्याण डोंबिवलीकरांना दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीत येत असून कल्याण आणि डोंबिवलीकरांना ते दिवाळीचे मोठे गिफ्ट देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हे गिफ्ट नेमकं काय असेल याबाबत विचारणा केली असता त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कल्याण डोंबिवलीकरांना नेमकं काय गिफ्ट मिळणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.