डोंबिवली दि.30 ऑक्टोबर :
शहराचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन आगामी काळात १५ डब्यांच्या लोकल डोंबिवलीसह कल्याणमधून सोडवण्यासाठी आपण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना माहिती दिली असून लवकरच सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. कै. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांची रेल्वे प्रवाशांशी असलेलं अतूट नाते सर्वश्रुत आहे, ते जपण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असून आपल्याला रेल्वे प्रवासातील अडचणी माहिती असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
डोंबिवलीच्या प्रवाशांशी नेहमीच रेल्वे प्रवासात चर्चा होत असते. बुधवारी चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधत जाहीरनामाही प्रवाशांना दिला. तसेच काही प्रवाशांनी आपल्याकडे मांडलेल्या अपेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर मांडणार आहोत. तसेच लांबपल्याच्या गाड्या वेळेत येत नाही त्यावर देखील आम्ही चर्चा केली आहे. जास्तीतजास्त समस्या कशा सुटतील यावर आपण लक्ष देणार असून महिला स्पेशल लोकल कल्याण, डोंबिवलीमधून सोडण्यासाठी विशेष लक्ष घातल्याचे सांगत रविंद्र चव्हाण यांनी महिला प्रवाशांना आश्वस्थ केले.