डोंबिवली दि.18 ऑगस्ट :
कोरोनामुळे गेली 2 वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र आता कोरोनाचा प्रादूर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी आयोजक आणि गोविंदा पथक सज्ज झाली आहेत. तर डोंबिवली पश्चिमेला दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक संदेश देणारी भव्य दहिहंडी सम्राट चौकात साजरी केली जाणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक सेलब्रिटीही उपस्थित राहणार आहेत.
डोंबिवलीत असणाऱ्या संवाद कर्णबधीर शाळेतील विद्यार्थी हे डोंबिवलीतील हंडी फोडून उत्सवाची सुरुवात करणार आहेत. या हंडीचे स्वरुप लहान असून ही हंडीही कमी उंचीवरील असेल. या उपक्रमातून एक सामाजिक संदेश दिला जाणार असल्याचे दिपेश म्हात्रे यांनी एक. तर याठिकाणी एक हंडी डोंबिवली आणि दुसरी दहीहंडी मुंबईतीली गोविंद पथकाकरीता तर तिसरी हंडी महिला गोविंद पथकाकरीता बांधली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीसह मुंबईतून जवळपास 100 पेक्षा जास्त गोविंद पथके ही हंडी फोडण्यासाठी येणार आहेत. त्यामध्ये सगळ्य़ात वरच्या थरावर असणाऱ्या लहान गोविंदाला सेफ्टी बेल्टही दिला जाणार असून गोविंदांच्या जिवित सुरक्षिततेची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे.
डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील सम्राट चौकात हंडी उभारली जाणार आहे. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार असून पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली जाणार आहे. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीला 30 वाहतूक वॉर्डनही पूरविले जाणार असल्याचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.
दहीहंडी मध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
राजेंद्र धात्रक :- 9702616860
कल्पेश म्हात्रे :- 9594293928
संतोष आंगणे :- 9221330231
सचिन वारंग :- 9892321719
प्रकाश कंक :- 9987946136
संदीप म्हात्रे :- 8976694444