7 नोव्हेंबरला केडीएमसीचे लसीकरण राहणार बंद
कल्याण – डोंबिवली दि.3 नोव्हेंबर :
उद्यापासून (4 नोव्हेंबर) पुढील 3 दिवस (6 नोव्हेंबरपर्यंत) केडीएमसीच्या महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोवीड लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे. या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर 6 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या मर्यादित कालावधीत कोवीड लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली. त्यामूळे कोविड लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व नागरिकांनी पुढील 3 दिवस आपल्या घरानजीक असणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाच्या पहिल्या/दुसऱ्या मात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन केडीएमसीच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
तर येत्या रविवारी 7 नोव्हेंबर 2021 रोजी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा बंद राहणार असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.