
कल्याण डोंबिवली दि.25 मे :
शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लससाठा उपलब्ध न झाल्याने उद्या 26 मे रोजी महापालिका क्षेत्रात कोवीड लसीकरण बंद राहणार आहे. शासनाकडून लससाठा उपलब्ध झाल्यावरच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले जाईल अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.