
कल्याण – डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात उद्या 23 ऑगस्ट रोजी 24 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जाणार आहे.
त्यातही कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.) या 2 ठिकाणी कोविशिल्डचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे.
तर कल्याणातील आर्ट गॅलरी, लाल चौकी ,कल्याण(प) आणि डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली ( पूर्व ) येथे कोवॅक्सिनचा 2 रा डोस दिला जाणार आहे.
तर उर्वरित उर्वरित 20 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे 1ला आणि 2 रा डोस दिले जाणार आहेत.
यासाठी आज रात्री ऑनलाईन स्लॉट 10 वाजता खुले होतील. तसेच ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत (झेरॉक्स कॉपी) लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य राहील याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.