कल्याण-डोंबिवली दि.14 जून :
कल्याण डोंबिवलीत उद्या (15 जून ) 21 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह याठिकाणी 18 वर्षे आणि त्यावरील दिव्यांगांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
उद्या प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) याठिकाणी “कोव्हॅक्सीन लसीचा केवळ 2 रा डोस” दिला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हे लसीकरण केलं जाणार आहे.
तर कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे 18 वर्षे आणि त्यावरील दिव्यांगांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण सुरू राहणार असून दिव्यांग नागरिकांनी युडीआयडी कार्ड किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून मिळालेले दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान ओळखपत्र इ. कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
त्याशिवाय कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी केंद्रांवर परदेशी जाणाऱ्या 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परदेशी शिक्षणासंदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पाहणी करूनच ही लस दिली जाणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केले आहे.
तर उर्वरित केंद्रांवर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे सकाळी 10 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. याठिकाणी कोवीशिल्ड लसीचा 1 ला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
Nice