Home ठळक बातम्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कल्याण डोंबिवलीतील झाडांची गणना सुरू

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कल्याण डोंबिवलीतील झाडांची गणना सुरू

कल्याण डोंबिवली दि.१५ जून : 

महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण अधिनियम1975च्या तरतुदीनुसार महानगरपालिकेच्या उद्यान-वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत कल्याण डोंबिवलीतील वृक्ष गणनेस प्रारंभ करण्यात आला आहे ही वृक्ष गणना नियमित वृक्ष गणनेपेक्षा वेगळी होणार आहे. या वृक्ष गणनेसाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवलीत सोळा वर्षांपूर्वी म्हणजेच साधारणपणे २००७ च्या सुमारास वृक्ष गणना झाली होती. मात्र ती साध्या आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. ज्यामध्ये सुमारे २ लाखांहून अधिक वृक्ष कल्याण डोंबिवलीत असल्याचे आढळले होते. मात्र यावेळी होणारी ही वृक्ष गणना अतिशय वेगळी असून यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मोबाईल ॲप सॉफ्टवेअर, जीपीएस यंत्रणा आणि डॅशबोर्डचा यामध्ये समावेश असेल अशी माहिती मुुुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव याांनी दिली. तसेच महापालिका क्षेत्रातील प्रत्येक झाड, सार्वजनिक जागा, मोकळया जागा, औद्योगिक परिसरासह खासगी मालमत्तेतील प्रत्येक झाडाची गणना करुन रेकॉर्ड ‍जतन केले जाणार आहे.

 

खयामध्ये 50 वर्षांहुन जास्त जुन्या वृक्षाची म्हणजेच हेरीटेज वृक्षांचीही गणना केली जाणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात कुठे कुठे नविन वृक्ष लागवड करणे शक्य आहे, हेदेखील या माध्यमातून पाहिले जाणार आहे. भविष्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील वृक्ष संपदा, महापालिका परिसरात कोणत्या प्रकारची किती झाडे आहेत याची महत्वपूर्ण माहिती या वृक्षगणनेद्वारे प्राप्त होणार आहे.

या वृक्ष गणनेची अंतिम माहिती आकडेवारी ही प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील महाविदयालयांसाठी विशेषत: वनस्पती शास्त्र शिकविणा-या महाविदयालयांमधील अभ्यासकांसाठी माईल स्टोन ठरणार आहे. महापालिकेने मागील वृक्ष गणना 2007 साली केली होती आता हीच वृक्ष गणना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे 6 लाख झाडे असणे अपेक्षित असून पुढील 15 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा