Home ठळक बातम्या डोंबिवलीतील सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपुलाची उभारणी; पीडब्ल्यूडीकडून 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर

डोंबिवलीतील सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपुलाची उभारणी; पीडब्ल्यूडीकडून 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर

 

कल्याण डोंबिवली दि.9 एप्रिल :
डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून शहरात विविध ठिकाणी रस्ते, उड्डाणपूल यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवली शहरातील सागाव – मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीचे आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या जंक्शन भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे देखील यासाठी सातत्याने आग्रही होते.

वाहतूक होणार अधिक वेगवान…
सागाव मानपाडा रस्त्यावरील सोनार पाडा जंक्शन हे अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या १.५ ते २ किमी अंतरावर हा चौक असल्याने या ठिकाणी शहराच्या विविध भागातून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. तसेच या ठिकाणी दोन शाळा देखील असल्याने शाळेच्या वेळेत बमुळे काही अंशी वाहतूक कोंडी देखील होते. मात्र या पुलाच्या उभारणीमुळे शहरातील स्टार कॉलनी, एमआयडीसी विभाग, गांधी नगर या भागात जाणारी वाहने पुलाखालून जातील. तर रेल्वे स्थानकाकडे जाणारी आणि स्थानकाहून येणारी वाहने उड्डाणपुलाच्या साहाय्याने येतील. यामुळे नागरिकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

डोंबिवली शहरात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प खासदार डॉ.शिंदे यांनी त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मार्गी लावले आहे. कल्याण रिंग रोड, मोठागाव उड्डाणपूल, शहरांतर्गत ९० फुटी रस्त्यांचे बांधकाम, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डोंबिवली एमआयडीसी आणि निवासी भागात रस्त्यांची उभारणी यांसह विविध रस्त्यांची कामे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पूर्णत्वास नेली आहेत. यासाठी राज्यसरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करणे, बैठका घेणे या माध्यमातून डॉ.शिंदे प्रयत्नशील होते.

डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहे. यामुळे ओघाने वाहनांची संख्या देखील वाढत आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागू नये यासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी नव्या रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवली शहरातील सागाव – मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीचे आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या जंक्शन भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यासाठी मागणी केली होती. तर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार राजेश मोरे हे देखील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आग्रही होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा