कल्याण दि.21 जून :
महापुरुषांचा अपमान , जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात कल्याणातही काँग्रेस पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Congress mudslinging protest in Kalyan against grand alliance government)
महापुरुषांचा सतत अपमान, जाती-धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ सतत खराब करणे, औद्योगिक विकासाला खिळ, पेपर फुटीचे ग्रहण, NEET चा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान, बेरोजगारी, शेतकऱ्यांची उपेक्षा, गुन्हेगारीत वाढ, अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली.
तसेच या प्रश्र्नी राज्य सरकारचा विरोध म्हणून यावेळी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रवीण साळवे, शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.