Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या 90 फूट रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा खळळखट्याक – अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ...

डोंबिवलीच्या 90 फूट रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा खळळखट्याक – अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत मनसेचा अल्टीमेटम

 

डोंबिवली दि.11 फेब्रुवारी :
डोंबिवलीहून कल्याणला येण्या-जाण्यासाठी एक प्रमूख रस्ता असणाऱ्या 90 फुटी मार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरापासून याठिकाणी सुरू असणाऱ्या खोदकामामुळे लोकांचे अतोनात हाल होत असून या प्रश्नावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 2 दिवसांत 90 फूट रस्ता वाहतुकीसाठी खुला केला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा डोंबिवली शहर मनसेने दिला आहे. या प्रश्नाविरोधात मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत हा अल्टीमेटम दिला आहे.

कल्याणहून डोंबिवलीला जाण्यासाठी आणि डोंबिवलीहून कल्याणला येण्यासाठी रेल्वे समांतर रस्त्याला लागून असणारा 90 फुटी रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र समांतर रस्त्यापेक्षा या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून स्थानिक रहिवासी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत स्थानिकांनी डोंबिवली शहर मनसेकडे आपली व्यथा मांडल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी या मार्गाची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तसेच आपला राग व्यक्त करण्यासाठी मनसेतर्फे यावेळी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छही देण्यात आला. त्याच्याशिवाय पुढील 2 दिवसांत हा रस्ता वाहतूकीसाठी खुला न झाल्यास मनसे स्टाईल उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

2 दिवसांत काम झाले नाही तर…मनोज घरत – शहराध्यक्ष, मनसे डोंबिवली
गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची ही दुरावस्था आहे.पावसाळा संपेपर्यंत आम्ही वाट बघत होतो. त्यांना हेच कळत नव्हतं की कोणाच्या माध्यमातून हा रस्ता करायचा आहे. आता मात्र डोक्यावरून पाणी गेलं आहे. लोकं वैतागली असून अपघात होत आहेत. आमच्या स्टाईलने समजावलं असून येत्या 2 दिवसांत काम झाले नाही तर उग्र आंदोलन करणार.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा