महाव्यवस्थापकांकडून कल्याण रेल्वे स्थानक, लोको शेडची पाहणी
कल्याण दि.११ नोव्हेंबर :
कल्याण गुड्स यार्ड रिमॉडेलिंगच्या सर्व कामांना गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी आज दिल्या. त्यांनी आज कल्याण रेल्वे स्थानकावरील स्टेशन व्यवस्थापक कार्यालय, आरपीएफ पोस्ट, महिला, पुरुष आणि वातानुकूलित प्रतिक्षालय इतर कार्यालयाच्या कामाच्या प्रगतीचीही पाहणी करत या सूचना केल्या.
लोकोमोटिव्हची विश्वासार्हता सुनिश्चित करून प्रत्येक लोकोमोटिव्ह सुरळीत आणि सुरक्षितपणे चालली पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. तर कल्याण रेल्वे स्टेशनच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कल्याण गुड्स रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला गती देऊन तो पूर्ण करण्यास त्यांनी सूचना केल्या.
इलेक्ट्रिक लोको शेडसह विविध ठिकाणांची केली पाहणी…
महाव्यवस्थापकांनी इलेक्ट्रिक लोको शेड, कल्याणला भेट दिली. शेडमध्ये त्यांनी थ्री फेज टीएम असेंब्ली आणि डिजिटल रॉकवेल हार्डनेस टेस्टरचे उद्घाटन केले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. शेडचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता यांनी इलेक्ट्रिक लोको शेडची उत्क्रांती आणि बिघाड कमी करण्यासाठी अवलंबलेल्या विविध उपायांबद्दल सादरीकरण केले. त्यानंतर अनिलकुमार लाहोटी यांनी कल्याण येथील डिझेल लोको शेडला भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. तसेच नॉर एअर ब्रेक टेस्ट स्टँडचे (Knorr Air Brake Test Stand) उद्घाटन करत डिझेल लोको शेड येथे वृक्षारोपणही करण्यात आले. तर कल्याण ते इगतपुरीपर्यंत विंडो ट्रेलिंगचेही त्यांनी या भेटीत निरीक्षण केले.
दरम्यान कल्याण रेल्वे यार्ड रि मॉडेलिंग प्रकल्पासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत.
साधारण 8 ते 10 वर्षे लागायला हरकत नाही असं वाटतं!!!