महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली सुरुवात
कल्याण दि.26 डिसेंबर :
महाविद्यालयीन अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला आजपासून कल्याणात दणक्यात प्रारंभ झाला. महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत हा क्रीडामहोत्सव सुरू झाला.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयातील कामकाजाव्यतिरिक्त इतर कलागुणांचा सकारात्मक विचार ठेवून संघटनेतर्फे २००५ पासून या क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र गेली 3 वर्षे कोरोनामुळे या स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. कॅरम, बुद्धीबळ, व्हॉलीबाॅल, बॅडमिंटन, क्रिकेट आदी खेळांचा त्यात समावेश आहे.
आजपासून सुरू झालेला हा क्रिडा महोत्सव २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या क्रिडामहोत्सवाचा शुभारंभ के.एम.अग्रवाल काॅलेज आणि संतोष स्पोर्टस् अकादमी , श्री काॅम्लेक्स, आधारवाडी जेल रोड, कल्याण येथे या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.
हा क्रिडामहोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. आर.बी.सिंह, क्रिडा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष दिलीप पवार, क्रीडा संयोजक/ युनिट प्रमुख अशोक मिश्रा, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सरचिटणीस दिलीप मोरे,माधव राऊळ, सुहास भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.