Home ठळक बातम्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : अंगणवाडी सेविकांच्या पाठीवर आमदार राजू पाटील यांच्याकडून...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : अंगणवाडी सेविकांच्या पाठीवर आमदार राजू पाटील यांच्याकडून शाबासकीची थाप

२१ हजार ८९५ लाडक्या बहिणींना मिळणार लाभ

कल्याण ग्रामीण दि.16 ऑगस्ट :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कल्याण ग्रामीणमधील २१ हजार ८९५ लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ होणार असून यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कामावर मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांच्याकडून शाबासकीची थाप देण्यात आली. आमदार राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या कामाचे आमदार पाटील यांनी कौतुक करत त्यांच्या अडचणींंसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.(CM Ladki Bahin Yojana: MLA Raju Patil applauds Anganwadi workers)

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेचा पहिला टप्पा वितरीत होण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. आता पर्यंत २१ हजार ८९५ महिला पात्र झाल्या असल्याचे सांगण्यात आले. या समितीचे सदस्य सचिव तहसिलदार सचिन शेजळ यांनी ही माहिती दिली आहे.

या समितीचे अध्यक्ष आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी योजनेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा कौतुक करत आमदार राजू पाटील यांच्या हस्ते त्यांचं गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा कौतुक करावे तेवढं कमीच आहे. त्यांच्या मागण्याही रास्त असून त्यांचा मी शासन pस्तरावर पाठपुरावा करत आलो आहे आणि यापुढेही करत राहणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे मनपा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील योजनेचाही आढावा घेण्यात येणार आहे. ही योजना शेवटच्या लाभार्थी बहिणीपर्यत पोहचविण्यासाठी तत्पर असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते,बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना पवार, पंचायत समिती संरक्षण अधिकारी निकिता नांदूरकर, अशासकीय सदस्य विवेक खामकर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा