Home क्राइम वॉच केडीएमसीच्या बाजार – परवाना विभागाच्या लिपीकाला ठाणे अँटी करपप्शनने दिड लाखांची लाच...

केडीएमसीच्या बाजार – परवाना विभागाच्या लिपीकाला ठाणे अँटी करपप्शनने दिड लाखांची लाच घेताना पकडले

कल्याण दि.1 फेब्रुवारी :
भ्रष्टाचाराचे कुरण अशी ओळख असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील लिपिकला तब्बल दिड लाखांची लाच घेताना ठाणे अँटी करपप्शन विभागाने शुक्रवारी सायंकाळी पकडले आहे. प्रकाश धिवर असे या लीपिकाचे नाव असून तो बाजार आणि परवाना विभागामध्ये कार्यरत आहे. (Clerk of KDMC’s Market – Licensing Department Thane anti-corruption caught taking a bribe of one and half lakh)

परवाना हस्तांतरित करण्याचा अर्ज स्विकृत करण्यासह परवाना हस्तांतरित करण्यासाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधित तक्रारदाराकडे करण्यात आली होती. त्यासंदर्भात या तक्रारदाराने ठाणे अँटी करपप्शन विभागाने तक्रार दाखल केली. ज्याची पडताळणी केली असता दिपक धीवर याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार ठाणे अँटी करपप्शन विभागाने शुक्रवारी सापळा रचून दोन लाखांच्या लाचेची तडजोडीअंती दिड लाख रुपये स्वीकारणाऱ्या या लिपिकाला रंगेहाथ पकडले आहे.
या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा