डोंबिवली दि.1 एप्रिल :
डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्वाच्या कोपर पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसविण्यासाठी पुन्हा एकदा डोंबिवलीच्या राजाजी पथ परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसविण्यासाठी गुरुवारी 1 एप्रिलच्या रात्री 12 पासून ते 2 एप्रिलला रात्री 12 पर्यंत राजाजी पथ रस्ता बंद राहणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Changes in traffic routes to install girders in the second phase of the kopar bridge; Rajaji Path will be closed for 24 hours
वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने हा कोपर पूल बंद करण्यात आला असून गेल्या वर्षीपासून त्याचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्यात या पुलाचे पहिल्या टप्प्यातील गर्डर बसवण्यात आले होते. त्यानूसार दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसविण्याचे काम केले जाणार आहे. ज्यासाठी डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड, आयरे गाव, रामनगर ते राजाजी पथ या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.तसेच रामनगरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना राजाजी पथ गल्ली नंबर 1 कडे येण्यास हा रस्ता पूर्णतः 24 तास बंद ठेवणार आहेत. त्यामुळे या रस्त्यावर आणि परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश्री शिंदे यांनी केले आहे.
Hi sir aapka LNN NEWS APP CHALU NAHI HO RAHA HAI