आजपासून २० जानेवारीपर्यंत लागू राहणार हे बदल
ठाणे दि.17 जानेवारी :
कासारवडवली ते गायमुखपर्यंतच्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असून कासारवडवली सिग्नल ते नागलाबंदर सिग्नलपर्यंत घोडबंदर रोड, ठाणे यामार्गावर गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. यावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ठाणेकडून घोडबंदर रोडचे दिशेने जाणारा मार्ग जड अवजड वाहनांकरता आज १७ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान रात्री ११.५५ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. (Change in traffic on Kasarvadvali to Gaymukh route to lay metro girders)
असे असणार आहेत या मार्गावर वाहतूकीतील बदल…
प्रवेश बंद – १) मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – (अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजुर फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – २) मुंबा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव – टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – ३) नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माणकोली नाका येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही माणकोली ब्रिजखालून उजवे वळण घेवून अंजुर फाटामार्गे इच्छितस्थळी जातील.
जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकताना कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप कट येथून डावीकडे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे नागला बंदर सिग्नल कटजवळ उजव्या बाजूला वळण घेवून मुख्य रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.
१) दि. १७ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ११.५५ वा. ते दि. १८ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत.
2) दि. १८ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ११.५५ वा. ते दि. १९ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत.
3) दि. १९ जानेवारी २०१३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. २० जानेवारी २०२३ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत.
ही वाहतूक अधिसूचना गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे. तसेच पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन, गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ती लागू राहणार नसल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.