Home ठळक बातम्या दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुरुकुल क्लासच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुरुकुल क्लासच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

 

कल्याण दि.२८ जून :
कल्याणातील नमंकित गुरुकुल सायन्स क्लासेसच्या दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. कल्याणातील ख्यातनाम बालरोग तज्ञ आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडचे अध्यक्ष डॉ. अनंत इटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून गुरुकुल सायन्स क्लास च्या माध्यमातून व्यवस्थापकीय संचालक वैभव ठाकरे आणि संचालक भाग्यश्री ठाकरे हे विद्यार्थ्यांना प्रगतीच्या वाटेवर नेण्यासह त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मोलाची मदत करत आहेत. गुरुकुल सायन्स क्लासेसच्या तब्बल एकशे दहा विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासह पुढील वाटचालीसाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टिकोनातून हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक वैभव ठाकरे यांनी दिली.

दहावी बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच गुरुकुल सायन्स क्लासेसच्या अशा माजी विद्यार्थ्यांचा ही यावेळी गौरव करण्यात आला ज्यांनी समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण रिव्हरसाइडचे अध्यक्ष डॉक्टर अनंत ईटकर मुथा कॉलेजच्या प्राचार्य गोखले मॅडम, दैनिक नवाकाळचे वितरण व्यवस्थापक यशवंत मौर्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या गुणगौर्य सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गुरुकुल सायन्स क्लासेसच्या शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा