Home ठळक बातम्या व्होट जिहादच्या नावावर विरोधकांकडून जाती धर्मात विभागणी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

व्होट जिहादच्या नावावर विरोधकांकडून जाती धर्मात विभागणी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

कल्याण दि.9 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा नारा देत धर्म आणि जातीच्या नावावर समाज विभागण्याचा प्रयत्न विरोधकाकडून केला जात आहे. मात्र विरोधकांना यात यशस्वी होऊ देऊ नका तर राज्याच्या विकासासाठी भाजपाला मतदान करा असे आवाहन कल्याण पूर्वेत स्मृती इराणी यांनी केले.१४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्यासाठी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारने मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामाची माहिती दिली. (Caste-Religion Division by Opposition in the Name of Vote Jihad – Union Minister Smriti Irani)

३७० कलम पुन्हा कधीही लागू होणार नाही…
मोदी सरकारने जम्मू काश्मीर मधील ३७० कलम रद्द केल्याने तिथल्या मुलीना त्यांचा वारसा हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आदिवासिना आरक्षणाचा तर मुलांचे संरक्षण करण्यासाठीचे अधिकार मिळाले आहेत. यामुळे ३७० कलम पुन्हा कधीही लागू होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. तर विरोधकांना रीजेक्शनचे इंजेक्शन द्या आणि कल्याण पूर्वेच्या विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर कॉंग्रेस आणि त्यांचे इतर मित्र पक्ष कायमच जनतेच्या हितापेक्षा स्वताच्या हितासाठीच राजकारण करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

यावेळी प्रदेश सचिव प्रिया शर्मा,मनीषा केळकर,जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी,महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, सरचिटणीस प्रीती दीक्षित, राजश्री राजपुरोहित, अर्चना सूर्यवंशी, भावना मंडारे,कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे,शिवसेना विधानसभा संघटक पल्लवी बांदेकर, उपाजिल्हा संघटक राधिका गुप्ते, शहर संघटक पुष्पा ठाकरे, कल्याण मंडळ अध्यक्षा सविता देशमुख, उल्हासनगर मंडळ अध्यक्षा पिंकी सिंग,ग्रामीण मंडळ अध्यक्षा संगीता पाटील मा. नगरसेविका हेमलता पावशे, इंदिरा तरे,शिवसेनेच्या मा नगरसेविका माधुरी काळे, संगीता गायकवाड, राजवंती मढवी शेट्टी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर मान्यवार पधादिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा