Home क्राइम वॉच चोरून वीज वापरणाऱ्या ३७ जणांवर गुन्हे दाखल; तब्बल २० लाखांची वीजचोरी उघडकीस

चोरून वीज वापरणाऱ्या ३७ जणांवर गुन्हे दाखल; तब्बल २० लाखांची वीजचोरी उघडकीस

 

कल्याण दि. २५ ऑगस्ट :

महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील कोनगाव परिसरात तब्बल २० लाखांहून अधिक किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. तसेच वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव आणि पिंपळास येथील ३७ जणांविरोधात भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे महावितरणला या धडक कारवाईत आढळून आले आहे. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिषेक व्दिवेदी आणि त्यांच्या प्थकने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

दरम्यान एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल केल्याप्रकरणी एकच खळबळ उडाली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा