मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदन
कल्याण दि.५ जानेवारी :
झारखंड राज्य सरकारने जैन धर्माचे 20 तिर्थकर ज्या भूमीत मोक्ष गेले ते पवित्र ठिकाण श्री सम्मेद शिखरजींचे पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटन स्थळांचा दर्जा रद्द करण्यात यावा अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.(Cancel the tourist spot status given to Sammed Shikharji – Former MLA Narendra Pawar)
सम्मेद शिखरजी हा केवळ एक जमिनीचा तुकडा नाही तर ते एक शाश्वत तिर्थ आहे. त्या ठिकाणच्या कणाकणात पवित्रता आहे, त्या ठिकाणच्या भूमीचे पर्यटनस्थळात रूपांतर करणे म्हणजे तिची पवित्रता नष्ट करण्यासारखं आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणाला देण्यात आलेला पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.