Home ठळक बातम्या कल्याणच्या केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे समाजातील वंचितांसाठी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’

कल्याणच्या केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे समाजातील वंचितांसाठी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’

 

कल्याण दि.24 डिसेंबर :
एखादी गोष्ट दुसऱ्यांना देण्यात जो आनंद आहे, समाधान आहे ते कशातच नाही. नेमका हाच धागा पकडत कल्याणातील द केम्ब्रिया इंटरनॅशनल शाळा आणि ज्युनिअर कॉलेजतर्फे ख्रिसमसच्या निमित्ताने ‘जॉय ऑफ गिव्हिंग’चा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

जगण्यातील खरा आनंद हा इतरांना आनंद देण्यात आहे. त्यातही समाजातील वंचित घटक जे या आनंदापासून वंचित आहेत, त्यांच्या आयुष्यात आनंदाची अनुभूती आणण्याच्या निर्मळ उद्देशाने केम्ब्रिया इंटरनॅशनलने पुढाकार घेतला. आणि बघता बघता या सामाजिक उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोणताही हात आखडता न ठेवता सढळ हाताने मदत करत आपापला वाटा उचलला. या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या तब्बल 300 किलोहून अधिक जीवनावश्यक वस्तू या समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या अनुबंध आणि लाभ या सामाजिक संस्थांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

आपल्या संस्कृतीत दानाला विशेष महत्व आहे. लहान मुलांना हे विद्यार्थ्यांना देण्याचे महत्व समजावे आणि त्यांच्या मनामध्येही समाजातील वंचित घटकांबाबत संवेदना जागृत व्हावी या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी दिली.

या उपक्रमात पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांच्यासह ट्रस्टी मीनल पोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका हिना फाळके, भूषण कुटे यांच्यासह पहिली ते दहावीचे विविध विद्यार्थी सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा