Home ठळक बातम्या शहाड रेल्वे स्थानकात मालगाडीचे कपलिंग तुटले; अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत

शहाड रेल्वे स्थानकात मालगाडीचे कपलिंग तुटले; अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत

 

शहाड दि. 7 जुलै :
मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे शहाड रेल्वे स्थानकात कपलिंग तुटल्याने कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र रेल्वे प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत अवघ्या अर्ध्या तासात मालगाडीचे डबे जोडून रेल्वे सेवा सुरळीत केली.

आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे कपलिंग शहाड स्थानकामध्ये तुटल्याने शेवटचे चार डबे मागे ठेऊन मालगाडी पुढे गेली होती. तर मालगाडी काही अंतरावर जाताच शेवटच्या डब्यामध्ये असणाऱ्या गार्डने मोटरमनला सूचना देताच मालगाडी थांबविण्यात आली.

ज्यामुळे कसारा, आसनगावकडून मुबईच्या दिशेने येणारी रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाली होती. मात्र या प्रकाराची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती काम हाती घेत अवघ्या अर्ध्या तासातच ही मालगाडी मार्गस्थ केली. त्यामुळे रखडलेली रेल्वे सेवा अर्ध्या तासात पुन्हा सुरु झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा