Home ठळक बातम्या Blackberry In Kalyan: मुंबईतील सगळ्यात मोठ्या ब्लॅकबेरी शोरुमचे कल्याणात उद्घाटन

Blackberry In Kalyan: मुंबईतील सगळ्यात मोठ्या ब्लॅकबेरी शोरुमचे कल्याणात उद्घाटन

डॉ. प्रशांत पाटील आणि एसीपी कल्याणजी घेटेंची प्रमूख उपस्थिती

कल्याण दि.१ जुलै :
कपड्यांच्या क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध ब्रँड म्हणजे ब्लॅकबेरी. या सुप्रसिद्ध ब्रँडचे मुंबईतील सगळ्यात मोठे शोरुम कल्याणमध्ये सुरू झाले आहे. केडीएमसीचे ब्रँड अँबेसेडर असलेल्या डॉ. प्रशांत पाटील आणि कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या हस्ते या भव्य शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. (Inauguration of Mumbai’s largest Blackberry showroom in Kalyan)

 

परवडेल अशा दरांमध्ये दर्जेदार उत्पादने…

दर्श एंटरप्राईजच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील ब्लॅकबेरीचे हे भव्य ३ मजली शोरूम सुरू झाले आहे. केवळ पुरुषांसाठी ( Gents Apperal) असणाऱ्या या शोरूममध्ये ग्राहकांना ट्राऊजर, शर्ट, सुट्स, टी शर्ट आदी अतिशय दर्जेदार उत्पादने उपलब्ध झाली आहेत. तेही मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा दरांमध्ये.

 

कोणत्याही समारंभासाठी आवश्यक असणारे प्रोडक्ट उपलब्ध…

ब्लॅकबेरी हा जागतिक पातळीवर नावाजलेला एक भारतीय ब्रँड असून १९९१ पासून तो या क्षेत्रात कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही समारंभासाठी आवश्यक असणारे प्रोडक्ट या शो रूममध्ये मिळणार आहेत. गेल्या ३ दशकांपासून ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचू शकलो अशी प्रतिक्रिया यावेळी ब्लॅकबेरीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

उद्घाटन समारंभाला मान्यवरांची उपस्थिती…

या उद्घाटन समारंभाला कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शिवसेनेचे माजी स्थायी समिती सदस्य श्रेयस समेळ, माजी नगरसेवक संजय पाटील, उप शहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारूक, निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्र तायडे यांच्यासह ब्लॅकबेरी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील विविध नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा